पुतण्यानं घराचा कारभार हातात घेतला तरी चिंता नाही, पण तुमच्या घरात तर कोणीच नाही – पवार

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा: माझा पुतण्यानं घराचा सगळा कारभार हातात घेतला तरी मला आनंद आहे, मला केवळ एक मुलगी आहे, तीच पण लग्न झालयंं, त्यामुळे माझ्या डोक्यावर कोणतही ओझ नाही, पण मोदींनी दुसऱ्याच्या घरात डोकावणे बरं नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धातील सभेत शरद पवारांच्या घरामध्ये कलह सुरु झाल्याचं म्हंटल होत, तसेच अजित पवार हे सर्व कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील सांगितले होते.

दरम्यान, मोदी मला भेटतील तेव्हा मी सांगेल की माझ्या घराच्या उठाठेवी तुम्हाला का पडलेत, पण माझ्या लक्षात आलं की माझ्या घरात बायको आहे, मुलगी, जावई – नातवंडे आहेत, पण मोदींच्या घरात कोणीच नाही. त्यामुळे त्यांना घर कसे चालवायचे माहित नाही. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.