मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव – शरद पवार

मुंबई : राज्यातलं मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. तसंच मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. एका पत्रकाद्वारे शरद पवारांनी सरकारवर हे आरोप केले आहे. राज्यकर्त्यांची ही योजना यशस्वी होऊ न देण्याची खूणगाठ मनाशी बांधा, असं आवाहनही शरद पवार यांनी केलंय.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्यात. शरद पवार यांनी आज एक पत्र लिहून मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून मराठा समाज आंदोलन करतो आहे. अशा वेळी हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार टाळले पाहिजेत. आत्तापर्यंत शांततेने चाललेल्या आंदोलनाला सर्वसामान्यांचा पाठिंबाच मिळाला आहे. त्याला धक्का लागेल अशी काही कृती करू नका असं आवाहन शरद पवार यांनी आपल्या पत्रकाद्वारे केले आहे.

Loading...

मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसंच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजे. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा आणि बहुजनांचा पाठिंबा सदिच्छा प्राप्त झाल्या, त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही याची खबरदारी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. असं पवार यांनी आपल्या पत्रकात म्हंटल आहे.

घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार

दूध का दूध पानी का पानी व्हायलाच हवं, ते संभाषण समाजापुढे आणा – अजित पवार

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील