सत्ता माझ्याकडे नाही, मला डायजेस्ट करता येत नाही ही भूमिका अयोग्य – शरद पवार

sharad pawar devendra fadnvis

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात शरद पवार यांनी राजकीय विषयांवर भाष्य केलं. राज्यावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना विरोधीपक्ष सरकारच्या निर्णयांवर आणि कामावर लक्ष ठेवून आहे. सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरून सातत्यानं विरोधी पक्षांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. विरोधी पक्षाच्या भूमिकेचा मुद्दा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर विरोधी पक्षाला काय सल्ला द्याल, असा सवालही केला. त्यावर शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

“विरोधी पक्षाचं म्हणजे एकतर विधान परिषदेतील विरोधी पक्षाची संपूर्ण टीम आहे. ती आपल्यासंबंधीच्या जबाबदारीचा इमॅक्ट करायला फार यशस्वीरित्या मला दिसत नाही. विधानसभेचं चित्र आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देखील सगळीकडे फिरताहेत. प्रश्न समजून घेण्याचा करताहेत. विरोधी पक्षाचं हे काम आहे, बोलणं, टीका टिप्पणी करणं. सत्ताधारी पक्षाची धोरणं कुठे चुकत असतील, तर त्याच्याबद्दल त्यांचा बोलायचा अधिकार आहे. आणि तो लोकशाही ज्यांना मान्य आहे, त्यांनी मान्यच केला पाहिजे. पण, त्याच्यामध्ये आकस आहे, असं दिसता कामा नये. आज काय या ठिकाणी दिसतंय की, एकेकाळी आजचे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि विरोधी पक्षात असलेले लोक हे एकत्रित काम करणारे होते. आज एकत्रितपणे काम करण्याची भूमिका आजच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने घेतली नाही. त्यामुळे आपल्या हातातील सत्ता गेली. याचं वैषम्य आणि अस्वस्थता ही विरोधी पक्षनेत्यांची अजिबात गेलेली दिसत नाही. अस शरद पवार म्हणाले आहेत.

सत्ता येते आणि जाते. पण, लोकांनी दिलेली जबाबदारी समर्थपणानं पार पाडायची असते. ज्यावेळेला सत्ता गेल्याच्या नंतर मी सुद्धा मुख्यमंत्री होतो. माझं मुख्यमंत्रिपद ८० साली गेलं. त्यानंतर मी विरोधी पक्षाचा नेता झालो. पण व्यक्तिगत माझा अनुभव असा आहे, मला विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करण्यात अधिक गंमत येत होती. त्याचं एक समाधान होतं. पण आज काय दिसतंय की, विरोधी पक्षनेता असं म्हणत असेल की, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीपद माझं गेलं. ते स्वीकायला मला वेळ लागला. म्हणजे सत्तेशिवाय मी चालू शकत नाही. जे प्रश्न लोक विचारतात, त्याला आम्ही सांगू शकत नाही. असंच अप्रत्यक्षपणे व्यक्त करण्यासारखं आहे म्हणून मला स्वतःला असं वाटत की, विरोधी पक्षाच्या नेत्यानं आपण स्वतः सत्ता हा आपला रस्ता नाही. आपण कधीकाळी होतो, आज त्याचा यत्किंचितही विचार करायचं कारण नाही. आज आपण विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी लोकांनी आपल्यावर दिलेली आहे, ती आपण समर्थपणानं पार पाडली पाहिजे. ती पार पाडण्यासाठी पडेल ते कष्ट केले पाहिजे. त्यासाठी सत्ता माझ्याकडे नाही, सत्ता माझ्याकडे नाही. मला डायजेस्ट करता येत नाही, विसरता येत नाही. ही भूमिका हे चांगलं नाही,” असा चिमटा काढत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला.

‘ती’ तर आमची चाल, सत्तास्थापनेवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीबाबत दावा केला होता की, सत्ता बनवण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती, २०१४ च्या सत्ताकाळातही राष्ट्रवादी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी तशारितीने बोलणी सुरु होती. यावर शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या असं भाजपाचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते, आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले, पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी म्हणून माझ्या कानावर निरोप आला. त्यावेळेला तो निरोप आल्यानंतर देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे आपल्या पक्षाबद्दल आणि आपल्याबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वत: पार्लामेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही, जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू, पण आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही आणि हे मी सांगायला जाताना एक गृहस्थ पार्लामेंटमध्ये माझ्या शेजारी होते, त्यांचं नाव संजय राऊत. त्यांना सांगून गेलो की, मी पंतप्रधानांना सांगायला जातोय, मी परत आलो, त्यावेळी राऊत तिथेच होते, त्यांच्या कानावरही मी पंतप्रधानांबरोबरची चर्चा घातली. अस शरद पवार म्हणाले आहेत.

तर, त्याचसोबत शिवसेनेने भाजपाबरोबर जाऊ नये अशी माझी पहिल्यापासून मनात इच्छा होती, ते जातील असे दिसले त्यावेळी मी जाणीवपूर्वक स्टेंटमेंट केले, आम्ही तुम्हाला(भाजपाला) बाहेरुन पाठिंबा देतो, त्यात शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी हा हेतू होता, पण तसं घडलं नाही, त्यांनी सरकार बनवलं, भाजपाच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही. कारण दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात, राज्याची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना आणि अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे हेच त्यांना मान्य नाही, त्यामुळे भाजपा आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणे धोका देणार आहेत म्हणून ही राजकीय चाल होती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.

..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत