fbpx

दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही,पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Devendra fadnvis and sharad pawar pune

टीम महाराष्ट्र देशा : नाशिक जिल्हा दत्तक घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह त्यांच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी हिरे कुटुंबियांचे पक्षात स्वागत केलेच, शिवाय नाशिक आणि नाशिकच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुकही केले. भाऊसाहेब हिरे यांचे नाशिकसाठी असलेल्या योगदानाबाबतही त्यांनी भाष्य केले. नाशिकच्या अनेक गोष्टी आहेत ज्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. फळबागायतीमध्ये क्रांती केलेला हा नाशिक जिल्हा असल्याचे गौरवोदगारही शरद पवार यांनी यावेळी काढले.

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

काहींनी सांगितले की मी नाशिक जिल्हा दत्तक घेतो, मला गंमत वाटली…आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही…दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही, स्वकष्टाने चालवतो…स्वकर्तृत्वाने घर चालवणारे आम्ही लोक आहोत…आम्हाला माहित होते की हे दत्तक विधान काही टिकणार नाही…आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही…अशी जोरदार टीका मुख्यमंत्र्यांवर करतानाच आपला खराखुरा जो बाप शेतकरी आहे, तोच आपला खरा घटक आहे, त्याच्या मदतीने पुढे जाऊया

राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही केला नाही