हे काय शहाणपणाचं लक्षण नाही ; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : चंद्रकांत पाटील हे ज्या पक्षाचे आहेत; त्या पक्षाने गेल्या ३० वर्षात स्वबळावर निवडणूक लढवली नाही. शिवसेना, रिपाईं यांना एकत्र घेवून नियोजन केले आहे. हे असे झालं ‘आपलं ठेवायंच झाकून अन दुसऱ्याचं बघायचं वाकून’ हे काय शहाणपणाचं लक्षण नाही, असा माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

दरम्यान, भाजपाचे नेते व राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे नुकतेच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्हात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान केले होते. तर अगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पाडणार असे भाकीत केले होते. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी चंद्रकांतदादा पाटील यांनी खिंडार पाडण्याचा नवा उद्योग कधी सुरू केला, असा टोला लगावला आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त ते साताऱ्यात आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले,

You might also like
Comments
Loading...