शहांची अटल बिहारींशी तुलना करणे म्हणजे विनोदच – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा नेता असतानाही आम्हाला बहुमत मिळालं आणि आम्ही यशस्वीपणाने दहा वर्षे राज्य केलं. त्यामुळे वाजपेयींच्या बरोबर अमित शहांची तुलना करणे हा विनोदच होईल. अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला आहे. अमित शाहांनी महाआघाडीवर केलेल्या टीकेबद्दल शरद पवार बोलत होत.

बारामती येथील गोविंद बाग येथे शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, भाजपने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली धोरणं अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाहीत. त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवून ते शेतकऱ्यांसंदर्भात धोरणे जाहीर करत आहेत. पण या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा त्यांना काही करायची वेळ लोक त्यांना येऊ देणार नाहीत. त्यामुळे त्यांनी काहीही भाष्य केलं तर त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असं मला वाटत नसल्याचं देखील शरद पवार म्हणाले आहेत.