सरकार मुस्लिमांना आंतकवादी तर दलित आदिवासींना नक्षलवादी ठरवत आहे : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा- भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असून,देशातील व राज्यातील सरकार सध्या मुस्लिमांना आंतकवादी तर दलित आदिवासी समाजाला नक्षलवादी व माओवादी ठरवत आहे . पहिल्या पासुन या लोकांची जन्मताच हि विचारसरणी आहे. भिमा कोरेगाव प्रकरणी नक्की काय घडलं हे जगाला माहित आहे असा पुन्नरऊच्चार पत्रकारांनी छेडलेल्या प्रश्नाला ऊत्तर देताना खा. शरद पवार यांनी केला.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

कुर्डूवाडी येथील के.एन.भिसे यांच्या पुतळा अनावरण व माजी आमदार विनायकराव पाटिल यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यानंत्र्र पत्रकारांशी ते बोलत होते. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात देखील पवारांनी अशीच टीका केली होती. पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन पुण्यात एल्गार परिषद भरवली तर सरकार त्यांना नक्षलवादी म्हणून जेलमध्ये टाकत आहे. भीमा कोरेगाव चा उद्योग कोणी केला हे सर्वाना माहित आहे मात्र या प्रकरणात ज्यांचा काहीही संबंध नाही अश्या लोकांना अटक केली जात असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला होता .

Shivjal