fbpx

…तर आमच्यासारखे नतद्रष्ट दुसरे कोणी ठरणार नाही : पवार

टीम महाराष्ट्र देशा- दुष्काळाच्या मुद्द्यावर आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. प्रश्न सरकारला लक्ष्य करण्याचा नाही, माझ्या शेतकऱ्यांचा आहे. आमची सुरुवातच शेतकऱ्यांपासून झाली आहे. संकटसमयी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली नाही, तर आमच्यासारखे नतद्रष्ट दुसरे कोणी ठरणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे. पवार यांनी ट्वीट करत भाजपला लक्ष्य केलं आहे.

नुकताच पवार दुष्काळाचे राजकारण करत आहेत, असा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता.पवार यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले होते की, ‘ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाल्याने ऑक्टोबर २०१८ पासून राज्य सरकारने दुष्काळ निवारण कामाची सुरुवात केली आहे. सरकार दुष्काळाबाबत गंभीर असून पिण्याचे पाणी, चारा, सर्वांना रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारकडून काम सुरु झाले आहे. तरीही राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही ही शरद पवार यांनी केलेली टीका योग्य नाही’असे म्हटले होते.