भाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार

मुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना त्याबद्दल काडीचीही आस्था नाही, दुष्काळावर चर्चा सुरु असताना भाजप राम मंदिराचा मुद्दा काढून समाजात दुषित वातावारण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे, घटनात्मक संस्थांवर हल्ले करुन त्या दुबळ्या करणाऱ्या भाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले.

Rohan Deshmukh

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी आगामी निवडणुकीत प्रतिगामी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत धर्माध, जातीयवादी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांची एकजूट झाली पाहिजे, त्यानुसार पुढील आठ दिवसात एकत्र बसू आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर पुढील दोन-चार वर्षांचा कार्यक्रम तयार करुया, असे आवाहन त्यांनी केले.नरेंद्र मोदी सरकावर हल्लाबोल केला.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...