‘न्यायालय, राज्यघटना, स्त्री-पुरुष समानता यापैकी काहीच भाजपवाले मानत नाहीत :पवार

pm vs sharad pawar

पुणे : ‘न्यायालय, राज्यघटना, स्त्री-पुरुष समानता यापैकी काहीच भाजपवाले मानत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यांतून आणि कृतीतून हेच दिसतं. ‘आम्ही म्हणून तीच पूर्व दिशा’ असा कारभार सध्या देशात सुरू आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्र सरकारवर केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव कार्यक्रमात ते बोलत होते.

सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्याला रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वत:च्या विचाराच्या व्यक्तीला तिथे पाठवले जाते. यातून सरकारचा कारभार दिसतो. ज्या व्यक्तिचा न्याय व्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही, अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता आहे. त्यामुळे देश धोक्यात आहे असं देखील ते म्हणाले.

युतीचे उमेदवार २०० जागांवर विजयी होतील; चंद्रकांत पाटलांना आत्मविश्वास

या भेटीमागे दडलंय काय ? जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर