सरकारच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी 44 वर्षानंतर आणीबाणी आठवते, पवारांचा मोदींना टोला

शरद पवार

पुणे : गेल्या चार वर्षात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी 44 वर्षानंतर आणीबाणी आठवते,वाजपेयीच्या सरकारमध्ये अस कधी झालं नाही असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पुण्यात आले होते. यावेळी बोलताना पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन अटक झालेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर केलेल्या कारवाईवर देखील पवार यांनी भाष्य केलं. पुण्याचे पोलीस अतिजागृत असून महाराष्ट्र बँक आणि मराठे यांच्यावर केलेली कारवाई म्हणजे पोलीस खात्याचा आततायीपणा असल्याची टीका पवारांनी केली. कायदा हातात घेऊन कसा गैरवापर करायचा हे उदाहरणं असून कारवाई करताना रिझर्व्ह बँकेचे नियम पाळणं गरजेचं होतं असं देखील पवार म्हणाले.Loading…
Loading...