स्वतःला सिंह म्हणवून घेणारे शहांच्या दर्शनाला गेले, राणाजगजितसिंहांना पवारांचा टोला

blank

टीम महाराष्ट्र देशा: ४० वर्षे ज्यांना सत्तेत बसवले त्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास करता आला नाही. ज्यांना आम्ही सन्मानाने बसवले त्यांना आता दुसऱ्या पक्षात बस म्हंटले कि बसावे लागते. स्वतःला सिंह म्हणवून घेणारे शहांच्या दर्शनाला गेले, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राणाजगजितसिंह पाटील यांना लगावला आहे.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे ऐकऐक शिलेदार सोडून जात असल्याने शरद पवार हेच आता मैदानात उतरले आहेत. मंगळवारी सोलापूर पाठोपाठ उस्मानाबाद येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

व्यवस्था उलथून जात असताना आपण बघ्याची भूमिका घेणार नाही. माझ्याइतके प्रेम अन्य कोणी केल्याचे उदाहरण दाखवा. सोलापूर येथील सभेत भाजपा अध्यक्षांच्या पायाचे दर्शन काहीजणांनी घेतले. स्वाभिमानाची नवी व्याख्या आता पहावी लागत आहे, जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे, असे सांगत ज्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांच्या हातात इतकी वर्षे सगळी सत्ता दिली होती. मग तेव्हा विकास का केला नाही? असा सवाल यावेळी शरद पवार यांनी केला आहे.