fbpx

विधानसभा जिंकण्यासाठी पवारांचा ‘मास्टर प्लॅन’, भाकरी फिरवणार आणि पीठही बदलणार?

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात खांदे पालट होण्याचे संकेत दिसत आहेत, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाकरी फिरवावी लागणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी रणनीती ठरवण्यासाठी आता खुद्द पवार यांनीच जिल्हावार कार्यकर्त्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकांना परिवर्तन हवं असल्याने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत बदल करावा लागणार, असं शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सांगितले होते. यानंतर आता पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी शरद पवार हे राज्यभरात कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. १२ जूनपासून त्यांचा दौरा सुरु होणार आहे. बैठकीमध्ये विधानसभेची रणनीती, स्थानिक प्रश्न, उमेदवारी संदर्भात चर्चा केली जाणार आहे.

शरद पवार यांचा दौरा

१३ जून – कोकण

१४ जून – उत्तर महाराष्ट्र

१५ जून -पश्चिम महाराष्ट्र

२१ जून – विदर्भ

२३ जून – मराठवाडा