ब्रेकिंग : शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँगेसच्या आमदारांची बैठक

blank

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. येत्या १२ तारखेला ही बैठक होणार आहे. शिवसेना – भाजपमधील वाद शिगेला पोहचल्याने राज्यात सरकार स्थापन करण्यास दिरंगाई लागत असल्याने शरद पवारांनी बोलवलेल्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. सध्या राज्याच्या राजकीय परिस्थितीच्या केंद्रस्थानी शरद पवार असल्याचं म्हंटल जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना भाजपमध्ये सत्तेच्या समान वाटपावरून कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीचा निकाल लागून १६ दिवस होऊनही सरकार स्थापन झालेले नाही. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही आश्वासन आम्ही दिलं नव्हत, असे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीवेळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सर्व पदांचं आणि जबाबदारीचं समान वाटप होणार असल्याचं आश्वासन दिलं होत, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

भाजप आणि शिवसेना या विधानसभा निवडणुकीत महायुतीकरून लढले होते. या महायुतीला राज्यातील जनतेने बहुमत देखील दिले. मात्र सत्ता संघर्षामुळे बहुमतं असूनही महायुतीला सरकार स्थापन करण्यात अपयश येत असल्याचं दिसत आहे. त्यात शिवसेनेने आम्हाला ठरल्या प्रमाणे द्या नाहीतर इतर पर्याय खुले आहेत, असा इशारा भाजपला दिला आहे. त्यामुळे शिवसेना राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या