शेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन

sharad pawar and akali dal

मुंबई : नुकतेच काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या तीनही कृषी विधेयकांना आपला विरोध आहे. म्हणून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर – बादल यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून तडकाफडकी राजीनामा दिला होता. हरसिमरत बादल या मोदी यांच्या एन.डी.ए प्रणित मंत्रिमंडळात अकाली दलाच्या एकमेव मंत्री होत्या.

त्यांच्या राजीनाम्यानंतर आज अजून एक बातमी आली की शिरोमणी अकाली दल या बादल यांच्या पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या युतीला देखील राम – राम केला आहे. अकाली दल आणि भाजप यांची जवळपास २२ – २३ वर्षांपासून युती होती. अकाली दल एनडीएदमधून अचानक बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अकाली दलाच्या नेत्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

शरद पवार यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.” कृषी विधेयकाच्या निषेधार्थ प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वात एनडीएतून बाहेर पडलेले अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि खासदार हरसिमरत बादल यांचे अभिनंदन, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद!”असे ट्विट त्यांनी केले आहे.

अखेर कृषी विधेयक झाले कृषी कायदा!

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या तिन्ही विधेयकास मंजुरी देत आपली स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रूपांतर आता निश्चित झाले आहे. दुसरीकडे, भाजपसह एनडीए आघाडीला अकाली दलाच्या बाहेर पडण्यामुळे मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या :-