‘…कोणाच्या वाटेला जात नाही, आणि कोणी गेलाच तर त्याला सोडत नाही’

टीम महाराष्ट्र देशा – संकटकाळात सर्व देशवासीयांनी एकत्र राहण्याची गरज आहे.काश्मीरमधील काही तरुणांची माथी भडकावण्याचे काम शेजारच्या देशातील दहशतवाद्यांकडून केले जाते आहे. असे काहीही झाले, तरी आपण आधी भारतीय आहोत. त्यामुळेच या हल्ल्यानंतर आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहिलो. आमची स्पष्ट भूमिका आहे की, आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, आणि कोणी गेलाच तर त्याला सोडत नाही. पुलवामा येथील हल्ल्याच्या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे मत व्यक्त केले. ते सासवड येथील राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत बोलत होते.

यावेळी पवार म्हणले, आज एका अडचणीच्या काळातून आपण जात आहोत. देशाच्या जवानांवर हल्ला झाला. त्यात ४० पेक्षा अधिक जवानांनी बलिदान दिले. काश्मीरमधील दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. काशमीर हा आपला भाग आहे. काश्मीरमधील काही तरुणांची माथी भडकावण्याचे काम शेजारच्या देशातील दहशतवाद्यांकडून केले जाते आहे. असे काहीही झाले, तरी आपण आधी भारतीय आहोत. त्यामुळेच या हल्ल्यानंतर आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहिलो.

आमची स्पष्ट भूमिका आहे की, आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, आणि कोणी गेलाच तर त्याला सोडत नाही. आजचे हे जे संकट आहे, किती दिवस चालेल ते माहिती नाही. पण आपण एकसंध, एकत्र राहायला हवे. पाकिस्तानातून आपला एक जवान भारतात सुखरूप परतला आहे. आपल्या सैन्याकडे एक जबरदस्त शक्ती आहे, त्यामुळे आपला जवान सुखरूप परतू शकला असल्याचे पवार यावेळी म्हणाले.