नारायण राणेंनी ‘ती’ चिट्ठी निवडली म्हणून कॉंग्रेसमध्ये गेले : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण यांच्या इंग्रजी आत्मचरित्र ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण कार्यकाळ कमी मिळाला, त्यांना जर पूर्ण कार्यकाळ मिळाला असता तर महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री मिळाला असता. राणे यांना शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अन्याय सहन करायचा नाही, हा त्यांचा स्वभाव त्यांना शिवसेनेत स्वस्थ बसू देत नव्हता असं विधान केले.

Loading...

पुढे बोलताना पवार यांनी ‘या घालमेलीतून त्यांनी शिवसेना सोडली. मात्र त्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी कोणत्या पक्षात जावं? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मग त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या. एक राष्ट्रवादी आणि दुसरी काँग्रेसची. त्यातली एक चिठ्ठी उचलली, ती काँग्रेसची होती. आता ही चूक होती की घोडचूक? हे मी बोलणार नाही असं विधान केले.

दरम्यान, पुढे बोलताना ‘नारायण राणे यांना नेतृत्व करायला देऊ असं आश्वासन दिलं होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं आश्वासन दिलं हे लक्षात ठेवायचं असतं. काँग्रेसमध्ये असे निर्णय होत नाहीत. काँग्रेसमध्ये आल्यावर चार पाच महिन्यात काही घडेल, अशी अपेक्षा ठेऊ नका, असा सल्ला मी त्यांना तेव्हाच दिला होता’ असंही पवार म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...