मुख्यमंत्र्यांकडे समस्या घेऊन जाणारे व्यक्ती त्यांना राष्ट्रवादीचेच वाटतात- शरद पवार

नाशिक: काल एक तरुण कृषिमंत्र्यांनी भेट द्यावी यासाठी थेट मंत्रालयावर चढला होता. दरम्यान हा तरुण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जात आहे. याच विषयावरून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. ‘आजकाल मुख्यमंत्र्यांकडे समस्या घेऊन जाणारा आंदोनकर्ता, शेतकरी त्यांना राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता वाटत असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय तर्कवितर्क काढले जात होते. मात्र ही भेट केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी असल्याच त्यांनी स्पष्ट केले आहे.