शरद पवार यांनी केले अजित पवारांचं कौतुक

‘पिंपरी- चिंचवड अचिव्हर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उधळली स्तुतिसुमने

पिंपरी-चिंचवड : ‘अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या विकासाची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांवर स्तुतिसुमने उधळली आहेत.अजित पवारांचं कौतुक करताना शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला टोला लगावला आहे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सृजन पब्लिकेशन यांच्या वतीने आयोजित ‘पिंपरी- चिंचवड अचिव्हर्स’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व गौरव कार्यक्रमात पवार काल (रविवार) बोलत होते.