नाणार प्रकल्प वादात शरद पवारांची उडी !

टीम महाराष्ट्र देशा : नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी सुरू असतानाच आता या वादात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उडी घेतली आहे. नाणार प्रकल्प हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून जावा असं वाटत नाही. पण स्थानिकांचा विरोध पाहता प्रकल्पाची जागा बदलता येते का यासाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो. प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतरच मी माझं मत व्यक्त करेल असं पवारांनी स्पष्ट केल आहे.

bagdure

दरम्यान, शिवसेनेने नाणार प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्यानंतर देखील सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. आता एकीकडे शिवसेना आणि दुसरीकडे नारायण राणे यांनी हा प्रकल्प होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प होणारच असल्याच सांगत शिवसेना आणि नारायण राणे यांची समजूत काढण्याचा विश्वास व्यक केला आहे. मात्र, आता या वादात शरद पवार यांनी उडी घेतल्यानंतर नाणार प्रकल्पात सरकारच्या डोकेदुखीत अजूनच वाढ झाली आहे.

You might also like
Comments
Loading...