..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत

sharad pawar udhav thackeray balasaheb thorat

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात शरद पवार यांनी राजकीय विषयांवर भाष्य केलं. तर महाविकास आघाडीच्या पुढच्या भविष्यावर देखील भाष्य केलं आहे. “हे सरकार पाच वर्षे चालेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढवू,” असं सुतोवाच शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले.

तर “देवेंद्र फडणवीस यांनी दोन गंभीर आरोप तुमच्यावर केले. त्यांच्या सांगण्यानुसार हे गौप्यस्फोट आहेत. त्यातील पहिला आरोप त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये केला की २०१४ साली तुम्हाला भाजपाबरोबर सरकार बनवायचं होतं. तुम्ही आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते हे महाराष्ट्रात सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा करत होते असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं,” असा प्रश्न संजय राऊत यांनी पवारांना विचारला. यावेळेस पवारांनी त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असण्या इतका अधिकार नव्हता असं मत व्यक्त करताना २०१४ ला भाजपा देण्यात आलेला पाठिंबा ही केवळ राजकीय चाल होती असं म्हटलं आहे.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार – उद्धव ठाकरे

फडणवीस यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बोलताना पवारांनी, “ते (फडणवीस) म्हणतात त्याप्रमाणे त्या काळामध्ये मी सेना आणि भाजपाचं सरकार बनू नये असं एक वक्तव्य मी जाणूनबुजून केलं. माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की सेनेने भाजपासोबत जाऊ नये. पण ते जातील असं ज्यावेळी दिसलं त्यावेळी मी जाणीवपूर्व वक्तव्य केलं की आम्ही तुम्हाला बाहेरुन पाठिंबा देतो. हेतू हा होता की सेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी. ते घडलं नाही त्यांनी सरकार चालवलं त्यात वाद नाही. मात्र आमचा हा सतत प्रयत्न होता की भाजपाच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही,” असं सांगितलं.

काँग्रेसमध्ये प्रतिभावान आणि ताकदवान नेत्यांना जागा नाही, पायलटांच्या पाठीशी सिंधिया उभे