आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो आणि सरकार खाणाऱ्यांचा – शरद पवार

माळशिरस: आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो आणि सरकार खाणाऱ्यांचा त्यामुळे पिकवणारा जगला तर खाणारा जगेल हि गोष्ट सरकारने लक्षात घेयला हवी म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. अकलूजमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचा जीडीपी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच बरोबर शेतीकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचे धोरण या गोष्टीसाठी कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

यावेळी बोलताना कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराला बाहेरचे लोक जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांना शोधून कठोर शिक्षा देण्याची मागणीही शरद पवार यांनी यावेळी केली.

You might also like
Comments
Loading...