सरकार शेतकऱ्याच्या जमिनचा लिलाव करून त्याची ईज्जत काढते ही शरमेची बाब-शरद पवार

वसंतराव झावरे यांचे अंतकरणातील स्थान कधीही जाणार नाही- खा.शरद पवार

भागवत दाभाडे / अहमदनगर : वसंतराव झावरे यांचे अंतकरणातील स्थान कधीही जाणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात खा.पवार बोलत होते. पंचायत राज व विधानसभेत प्रभावी काम करून दुष्काळी पारनेर तालुक्याचा चेहरा बदलण्याचे काम वसंतराव झावरे यांनी केले.चार पिढीपासुन समाजसेवेचे काम झावरे घराणं तालुक्यात व जिल्हात करत आहे त्यामुळे समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करणारा आहे.

एका दृष्टीने तालुका बदलतोय परंतु ज्यांचे प्रश्न सोडवायचे त्यांचा प्रधान्यक्रम बदलला.दुष्काळी तालुक्यात शिक्षणाची गंगा आणुन सन्मनाने जगता येईल हा प्रयत्न महत्वाचा आहे. गुरूजींचा तालुका हा पारनेर तालुक्याची ओळख असुन नोकरीनिमित्ताने महाराष्ट्र भर ओळख आहे.

bagdure

८८ हजार रूपयांची कर्ज मोठमोठ्या उद्योगपतीने बुडविले आहे त्यामुळे सरकार या बड्या उद्योपतीसाठी हे कर्ज माफ करण्याचा प्रयत्न करत आहे.परंतु आमच्या शेतकराने कर्ज थकविले तर त्याच्या जमिनचा लिलाव करते व त्याची ईज्जत काढते ही शरमेची बाब आहे.शेती व शेतीमाला संदर्भात सरकारची नियत चुकीची व गुंतागुतीची आहे.त्यामुळे शेतीमालेला हमीभावासह इतर गोष्टी चा विचार करावा.

त्यामुळे माझ्यावर खाणाराची काळजी नसल्याचा आरोप होत असतो. परंतु पिकवणारा शेतकरी जगला नाही तर खाणारा जगणार नाही. फडवणीस सरकारचे लबाडाचे आवतण हे खाल्याशिवाय नाही असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

यावेळी दिलीपराव वळसे पाटील, मधुकरराव पिचड, माजी खा.यशवंतराव गडाख, दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील,आमदार अरुनकाका जगताप, संग्राम कोते,नरेंद्र घुले पाटील, आमदार वैभव पिचड, आमदार , राहुल जगताप, जि. प .उपाध्यक्ष राजश्रीताई घुले,शारदा लगड, विठ्ठलराव लंघे, अभिषेक कळमकर, आशुतोष काळे, आदी नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...