fbpx

‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा :  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच राज्यासह देशातही कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन केलं आहे. शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा मावळमध्ये दारूण पराभव झाला आहे. तसेच कोल्हापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला जागा टिकवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी ही पोस्ट टाकत कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा आणण्याचे काम केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसला पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघात सत्ता राखता आली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला.