राणेंचा निर्णय जनतेला किती आवडेल याबद्दल शंका :पवार

पवार सरकारविरोधात रणशिंग फुंकण्याच्या तयारीत

पुणे:नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार कि आपली स्वतंत्र चूल मांडणार याबद्दल तर्क वितर्कांना उधान आलं असताना राणेंचा हल्लीच्या निवडणुकीतील इतिहास पाहता राणेंचा निर्णय जनतेला किती आवडेल अशी शंका उपस्थित करत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी राणेंच्या राजकीय भविष्यासंदर्भात सूचक विधान केलं आहे .

काय म्हणाले नक्की पवार ?
नारायण राणेंनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा पण गेल्या 3 निवडणुकात नारायण राणे यांच्याबद्दल जनतेनं नापसंती व्यक्त केली असे कोकणातले एक मंत्री म्हणाल्याचं मी वाचलं. यामुळे सिंधुदुर्ग परिसतातील लोकांना राणेंचा निर्णय जनतेला किती आवडेल याबद्दल शंका शरद पवारांनी उपस्थित केली  आहे .

पवार सरकारविरोधात रणशिंग फुंकण्याच्या तयारीत

पेट्रोल दरवाढ ,नोटबंदी,बेरोजगारी यामुळे अर्थव्ययस्था अडचणीत आलीय,3 वर्षातच कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र विचारायची वेळ आलीय पर्याय।म्हणून जनता विरोधी पक्षांकडे आशेने बघतेय,आम्ही लवकरच या मुद्दयावर समविचारी पक्षांशी चर्चा करू असं सांगत पवारांनी सरकार विरोधात रणशिंग फुंकणार असल्याचे संकेत दिले

You might also like
Comments
Loading...