fbpx

‘एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं’

पुणे : पुण्यात झालेल्या एल्गार परिषेदच्या आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पोलिसांनाच टार्गेट केलं आहे. ‘मी जर सत्तेत असतो, राज्यकर्ता असतो तर एल्गार परिषदेवर खटले दाखल करणाऱ्या पुण्याच्या पोलीस कमिशनरला सस्पेंड केलं असतं,’ असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

शिवगौरव सन्मान सोहळा या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, मा.म. देशमुख, दादा पासलकर ,प्रताप गंगावणे , शंतनू मोघे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यावरून पवारांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याचं काम कोळसे पाटील करतात, असं शरद पवार म्हणाले. आम्ही सत्तेत असतो, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं असं पवार म्हणाले.