Share

Sharad Pawar | निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादाला आत वेगळं वळण मिळालं आहे. त्याचबरोबर अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणुकीपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच यावर अनेक राजकीय पक्षनेत्यांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

निर्णय हे गुणवत्तेवरून घेतल्या जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो, ते घडलं. पण असं घडेल असं माझं मन मला सांगत होतं, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. आज शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आता इथून पुढे निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल, तर ती जे चिन्ह ठरवेल ते शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो, निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.

आता शिवसेनेसमोर काय पर्याय असणार?, असा सवाल पवारांना विचारण्यात आला. त्यावर आता नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणूक लढवायची. मी स्वत: पहिली निवडणूक लढलो तेव्हा बैल जोडीवर लढलो होतो. दुसरी निवडणूक ही गाय-वासरू या चिन्हावर लढलो होतो. तिसरी निवडणुकीत चिन्ह चरखा होतं. चौथी निवडणूक हाताचा पंजा या चिन्हावर लढलो आणि आता घड्याळ हे चिन्ह आहे. एवढ्या वेगवेगळ्या चिन्हावर मी स्वत: लढलो आहे. आणि त्याचा काही फायदा होत नाही, लोक ठरवतात, असं पवार म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, नावाबाबत मी कोण सांगणार, ते उद्धव ठाकरेच ठरवतील. उद्या शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असंही होऊ शकतं. तसेच, शेवटी सत्तेचा गैरवापर करून निवडणुका कोणी लढवत असेल तर लोकांना ते आवडत नाही

पत्रकारांनी आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना संपणार असल्याचं बोललं जात असल्याचं सांगितलं. शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरूण पिढी आहे ती जिद्दीने उतरेल आणि ते आपली शक्ती वाढवतील.या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होण्याचं काहीच कारण नाही. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. हे कायम एकत्र राहतील, यात काहीच शंका नाही. आता जी पोटनिवडणूक आहे त्या निवडणुकीला काँग्रेसने पाठिंबा दिला, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला असल्याचं पवारांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादाला आत वेगळं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now