लफडी केली तर इडी अन् येडी मागे लागणारच – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : आमच्या संस्थेची चौकशी सुरू झाली आहे, आम्हाला नोटीस आली आहे आणि आता आम्हाला विकास करायचा आहे़ अशा सबबी सांगून काही जण पक्षातून बाहेर पडले़ यांनी नको ती लफडी केली म्हणूनच ईडी अन् येडी यांच्या मागे लागली आहे़. काही जण १४ वर्षे मंत्री होते तेव्हा त्यांना विकास करायचे सुचले नाही का? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांना लगावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

युती सरकारच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ मी कृषीमंत्री होतो तेव्हा शेतकऱ्यांसाठी सरसकट ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. देशाचे गृहमंत्री म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाहीत. हेच सरकार मात्र बँकांच्या मजबुतीकरणासाठी ८७ हजार कोटी रुपये देत आहे़ आमच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात कारखाने उभे राहिले. यंदा नगर जिल्ह्यातील कारखाने दोन महिनेही चालणार नाही अशी परिस्थिती आहे़ या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील कारखाने बंद पडून लाखो बेरोजगार झाले आहेत. असा घणाघात पवार यांनी सरकारव केला आहे.

यंदा महाराष्ट्रात दुष्काळ आणि पूर असे दुहेरी संकट ओढावले, अशा परिस्थितीत राज्याच्या प्रमुखाने जनतेला धीर द्यायचा असतो. मुख्यमंत्री मात्र राज्यात महाजनादेश यात्रा काढतात. मी आज सत्तेत नाही तरीही सत्ताधारी झोपेतही ‘पवार पवार’ असे चावळत आहेत. असा टोला देखील पवार यांनी लगावला आहे.

मात्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...