आमचा विद्यार्थी सहामाही पास झालायं, प्रॅक्टिकल अजून बाकी आहे – शरद पवार

udhav Thackeray

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. यात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर भाष्य केलं आहे. सहा महिने हा परीक्षेचा काळ असतो. जसं पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा असायच्या मग ते प्रगती पुस्तक येतं पालकांकडे. तसं या सरकारचं सहा महिन्यांचं प्रगती पुस्तक आपल्याकडे आलंय का? असा सवाल राऊतांनी पवारांना विचारला. यावर शरद पवार म्हणाले की, ‘बरोबर आहे. पण आता ही सहा महिन्यांची परीक्षा झालीय. परीक्षा संपूर्ण झाली असे मला वाटत नाही. परीक्षेतला प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे.’ अस पवार म्हणाले आहेत.

तर, आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा हे सरकार यशस्वी होईल असा आता ट्रेंड दिसतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही. राज्याचा विचार करून तुम्ही विचारत असाल तर या सहा महिन्यांत परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणाने सोडवेल अशी खात्री आहे.’ असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

मी ‘त्यांचा’ गुरू आहे असे म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका – शरद पवार

आपण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी सांगताय? असा सवाल पुन्हा राऊत यांनी उपस्थितीत केला असता पवार म्हणाले की, ‘अर्थात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयीच मी हे बोलतोय. कारण शेवटी राज्यप्रमुख महत्त्वाचा असतो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम काम करते. त्यामुळे त्याचे श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार.’

दरम्यान, या मुलाखतीत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना गुरु म्हणतात यावर आपल परखड मत व्यक्त केलं आहे. आपण मोदींचे गुरू आहात असे ते म्हणतात. अशा वेळी आपण आपल्या शिष्याला हे सांगायला हवं की, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय आपल्याला कठोरपणे घ्यावे लागतील असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले, ‘मी त्यांचा गुरू आहे असे म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाही अडचणीत आणू नका. गुरू वगैरे सोडा, राजकारणात कुणी कुणाचा गुरू वगैरे असत नाही. आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही’. अस शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात लॉकडाऊन का ? अजित पवारांचा मोठा खुलासा