खड्डेमुक्त रस्त्यावरून आता शरद पवार यांनी केल चंद्रकांत पाटलांना लक्ष

चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणा-यांनी रायगड-उरणचे रस्ते पाहिल्यास त्यांना विश्रांतीच घ्यावी लागेल अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बांधकाममंत्री चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी, कामगार, मच्छीमार, बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर आयोजित केलेल्या जाहीर मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान, १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास आपण राजीनामा देऊ अस विधान राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल होत. आता ही डेडलाईन संपली असून राज्यातील बरेचशे रस्ते हे खड्डेयुक्तच असल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर मोठी टीका होत आहे.