राज ठाकरे आघाडीत नसणारच ; पवारांनी मौन सोडले

टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. एकीकडे या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मनसेसोबतच्या आघाडीचं वृत्त फेटाळलं आहे.

शरद पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेची आघाडी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच राज ठाकरेंसोबत आघाडीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही, अशी माहितीही पवार यांनी दिली आहे.