सत्ता परिवर्तन होणार, नागरिक देश हितासाठी मतदान करतील – पवार

sharad pawar cast vote

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे, यामध्ये महाराष्ट्रातील १७ जागांसह देशभरातील ७२ जागांचा समावेश आहे, देशात आणखीन तीन टप्यातील मतदान बाकी असले तरी राज्यातील ४८ मतदारसंघातील मतदान आज पूर्ण होत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला, जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांनी देखील यावेळी मतदान केले आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी सत्ता परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

देशामध्ये स्थिर सरकार येणे आवश्यक आहे, त्यामुळे जागरूक प्रतिनिधी संसदेत पाठवणे गरजेचं आहे. नागरिक देशाच्या हिताचा विचार करून मतदान करतील, असेही पवार म्हणाले.

सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

ठाणे-5.98 %

पालघर-7.21 %

भिवंडी-5.92 %

कल्याण-4.28 %

मावळ-5.69%

शिरुर-6.33%

शिर्डी-7.43 %

दिंडोरी-5.69 %

नाशिक-5.21 %

नंदुरबार-7.13 %

धुळे- 6.07 %Loading…
Loading...