नवाब मलिकांच्या आरोपांची हवा खुद्द शरद पवारांनीच काढली ?

sharad pawar - nawab malik

पुणे : कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना भेटण्यात गैर काही नाही. मात्र अधिकाराचा गैरवापर होता कामा नये,’ असं पवार म्हणाले आहेत. तर, ‘मी अनेक वर्षे सत्तेत होतो, अनेक वर्षे विरोधी पक्षात होतो. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा सगळे अधिकारी मलाही भेटत होते. मी एखादी सूचना केली आणि ती योग्य असेल तर त्याला नाही म्हणायचे नाहीत. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणं यात गैर काही नाही. अधिकाराचा गैरवापर होत असेल तर ते अयोग्य आहे. अस देखील पवार म्हणाले आहेत.

‘माजी मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना भेटत असतील, उद्या पृथ्वीराज चव्हाणही अधिकाऱ्यांना भेटले तर यात काही चिंता करण्याचं कारण नाही. अधिकारी हे सर्वांना व्यवस्थित ओळखत असतात. कधी, केव्हा, कशी पावलं टाकायची हे त्यांना बरोबर माहीत असतं’, असं देखील शरद पवार पुढे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या