एकदा मैदानात येऊन दाखवा, मला लढण्याची गरज पडणार नाही; शरद पवार

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्यानेच त्यांनी माघार घेतली, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती, ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना ज्यांनी आयुष्यात मैदान पाहिलं नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

पराभव दिसल्याने पवारांनी मैदान सोडल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात, पण मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. आजवर १४ निवडणुका जिंकल्या. एकदा मैदानात येऊन दाखवा. मला लढण्याची गरज पडणार नाही, आमचे इतर पहिलवानच तुम्हाला भारी पडतील. असं म्हणत पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे.

फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी कधी शेतकऱ्यांसाठी काम केलं नाही, कामगारांसाठी काम केलं नाही. फक्त सत्ता हातात घेतली आणि त्या सत्तेचा काय भरण्यासाठी वापर केला ते मी जाहीर बोलू इच्छित नसल्याचं यावेळी पवार म्हणाले.