fbpx

शरद पवार ‘एनडीए’त जाऊ शकतात : नारायण राणे

narendra modi with sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाला निवडणुकांच्या निकालाचे वेध लागलेले आहेत. तसेच निकालांनंतर पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा संपूर्ण देशभरात सुरु आहे.

माध्यमांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार ‘एनडीए’ केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल अशी शक्यता आहे. परंतु काही माध्यमांच्या अंदाजानुसार ‘एनडीए’ला काही जागा कमी पडण्याची शक्यता आहे. याविषयी बोलताना महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी एक मोठ विधान केले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नारायण राणे यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपला सत्ता स्थापनेसाठी मदत करू शकतात असं विधान केले आहे. तसेच एक्झिट पोलवर भाष्य करताना त्यांनी ‘एक्झिट पोलवर आपला विश्वास नाही’ असंही नारायण राणे म्हणाले आहेत.