fbpx

शरद पवार भाषणाला येताच जनसमुदायाने धरला घरचा मार्ग

ncp shard pawar

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने राज्यभरात चांगलाच प्रचार सभांचा धडाका लावला आहे. मात्र आता या प्रचार सभांना जनते कडून हवा तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. कारण मंगळवारी झालेल्या उल्हासनगर येथील सभेत शरद पवार जनसमुदायाला संबोधित करायला येताच श्रोत्यांनी आपला घरचा मार्ग धरला. त्यामुळे सभास्थळी अनेक खुर्च्या रिकाम्या पडल्या.

मंगळवारी उल्हासनगर येथील गोलमैदानात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सभा आयोजित करण्यात आली. ही सभा ७ वाजता सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र सभा रात्री ९ वाजता सुरु झाली. त्यामुळे आतुरतेने पवार साहेबांना ऐकायला जमेलाला समुदाय हा कंटाळून भाषण न ऐकताच निघून गेला. मात्र पवार साहेबांना सभे ला पोहचण्यास उशीर होत असल्याने याआधी स्थानिक लोकप्रतिनिधींनी भाषण करून श्रोतु वर्गाला जमवून ठेवण्याचा प्रयत्न केला. तर पवार साहेब संबोधित करायला येताच लोकांनी घरचा मार्ग धरला. त्यामुळे आता या प्रसंगामुळे स्थानिक पातळीवर उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.

दरम्यान यंदा कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी लढत पहिला मिळणार आहे. तसेच आतापर्यंत या लोकसभा मतदार संघामधून हमखास शिवसेनेचाचं उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत या जागेवर विजय संपादन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून जोरदार प्रयत्न सुरु आहे.