शरद पवारांनी उद्या बोलावली पक्षाची तातडीची बैठक

jayant patil and sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. मुंबई मधील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी झालेल्या कारवाईबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नालासोपारा-साताऱ्यात त्यांच्या समर्थनार्थ निघणारे मोर्चे यावर पार्टीची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात यावेळी चर्चा होणार आहे.

निलेश लंके राष्ट्रवादीच्या वाटेवर ? अजित पवारांची घेतली भेट