Sharad Pawar | ‘अजित पवार पुढचे मुख्यमंत्री’; आमदाराच्या इच्छेवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा सुरु आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले होते. अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य लंके यांनी याआधी अनेकवेळा केले होते.

2004 साली शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग झाला त्यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची संधी आयती चालून आली होती. तरीही असे असताना अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“कुणाला काही आवडेल, पण आमच्याकडे संख्या असली पाहीजे ना. आमच्याकडे आज संख्या नाही. क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही”, असे शरद पवार म्हणाले आहेत.

“अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, कामाला लागा” (Nilesh Lanke of big statement about Ajit Pawar)

जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार निलेश लंके यांनी ‘राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा”, असे आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत मविआतील तिनही पक्षांनी विधानसभा निवडणुका सोबतच लढण्याच्या आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ठरू शकतात.

राज्यात 1999 साली काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी ज्यांचे आमदार अधिक त्यांचा मुख्यमंत्री, असा फॉर्म्युला ठरला होता. 1999 साली कांग्रेसचे 75 आमदार तर राष्ट्रवादीचे 58 आमदार निवडून आले होते. त्यानुसार काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्यात आला. मात्र 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 71 आमदार निवडून आले होते तर काँग्रेसचे केवळ 69 आमदार निवडून आले होते. तसेच राष्ट्रवादीला अनेक अपक्षांचा देखील पाठिंबा होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणे सहच सोपे होते. मात्र शरद पवार यांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देऊन त्याबदल्यात महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.