पंतप्रधानपदासाठी विराट कोहलीचा विचार करावा लागेल : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत जोरदार बॅटींग केली. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्यसरकारवर हल्लाबोल केला. यावेळी पंतप्रधानपदाविषयी विचारलेल्या एका प्रश्नावर पवारांनी गुगली टाकून हशा पिकवला.

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ, स्मिथ-वॉर्नरवरील बंदीचा निर्णय योग्य- सचिन

पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत माजी क्रिकेटपटू इम्रान खान पंतप्रधानपदावर विराजमान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या नात्याने तुम्हाला पंतप्रधान होण्यासाठी आवडेल का असा प्रश्न विचारला असता पवारांनी, “लोकसभा निवडणुका आता जवळ येत आहेत, पाहूया काय होतंय. भारतात या पदासाठी कदाचित विराट कोहलीचा विचार करावा लागेल”, असं उत्तर दिलं. देशाचा आणि जागतिक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष या नात्याने इम्रान खानशी आपले संबंध आले आहेत, मात्र राजकारणी म्हणून मी इम्रान खानला कधीही भेटलो नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र यावं, मग बघू…- अजित पवार