जेव्हा शरद पवार यमाला सांगतात, हे यमा ! इतक्यात मी येणार नाही

sharad pawar

पुणे: राजकारणात भल्या-भल्यांना घाम फोडणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे ‘यमा’ला देखील काही सांगण्यात मागे राहणार नाहीत याचं चित्र सोमवारी पुण्यात पहायला मिळालं. निमित्त ठरले ते ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे. झाल अस कि, सोमवारी टिळक स्मारक येथे या नाटकाचा ७०२ वा प्रयोग पार पडला. यावेळी शरद पवार यांनी सहकुटुंब हजेरी लावली होती. तब्बल अडीच तास पवार यांनी संपूर्ण नाटक मन लावून पाहिले,

प्रयोगानंतर नाटकाच्या संपूर्ण टीमची ओळख त्यांना करून देण्यात आली. यावेळी नाटकामध्ये ‘यमा’ची भूमिका साकारणारे प्रवीण डाळिंबकर यांना शरद पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. या सेल्फी दरम्यान पवार यांनी ‘ हे यमा ! इतक्यात मी येणार नाही म्हणत मिश्किल टिप्पणी केली, पवार यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला होता.

सारा एंटरटेन्मेंट निर्मित, विद्रोही जलसाच्या सहकार्याने रंगमळा सादर करीत असलेल्या नंदू माधव दिग्दर्शित आणि भगवान मेदनकर यांची निर्मिती असलेल्या “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” या नाटकाचे तब्बल ७०0 हून अधिक प्रयोग रंगभूमीवर गाजले आहेत. सोमवारी पुण्यामध्ये टिळक स्मारक येथे नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जेष्ठ नेते शरद पवार, प्रतिभाताई पवार, खा सुप्रिया सुळे, खा रजनी पाटील यांची नाटकाला विशेष उपस्थिती लाभली. यावेळी शाहीर संभाजी भगत यांनी शरद पवार यांचे स्वागत केले, तर पत्रकार युवराज मोहिते यांनी संपूर्ण नाटकाचा खडतर प्रवास उलगडून सांगितला.

आजवर अनेकांनी मला हे नाटक बघा म्हणून सांगितले होते, आता नाटकाला येता आलं याचा आनंद झाल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केले. देशामध्ये अनेक राजे होवून गेले. मात्र, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य हे केवळ भोसल्यांचं नाही तर रयतेचं होतं, देशात आज वेगळ वातावरण पहायला मिळत आहे. माणसांमध्ये अंतर कमी करण्याच सोडून ते वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ता येते जाते पण समाज हिताची जपवणूक करणे गरजेच आहे, त्यामुळे हे नाटक लोकांपर्यंत गेल पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.

'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाच्या प्रयोगाच्या माध्यमातून सामान्य माणूस एकत्रित विचार करून समाज गतिमान…

Sharad Pawar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜೂನ್ 18, 2018