हे कसं झालं, मलाही कळलं नाही ! – शरद पवार

शरद पवार

अहमदनगर: अलीकडं नगर जिल्ह्यात दोन्ही खासदार शिवसेना-भाजपचे निवडून येऊ लागले आहेत, असा प्रश्न विचारला असता, ‘एकेकाळी नगर जिल्ह्यात लाल बावट्याचा जोर होता. हा लाल जिल्हा भगवा कधी झाला कळलंच नाही,’ असं माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटल आहे.

नगर जिल्ह्यातील लाल निशाण पक्षाचे लढवय्ये नेते माजी आमदार कै. कॉ. पी. बी. कडू पाटील यांच्या पहिल्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम शरद पवार यांच्या उपस्थितीत राहुरी तालुक्यातील सात्रळ या गावात झाला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार गणपतराव देशमुख यांना कडू पाटील यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.