आज भारताचा विजय निश्चित ; शरद पवारांची मैदानात ‘एन्ट्री’

टीम महाराष्ट्र देशा : आशीया कप स्पर्धेत भारताने हॉंगकॉंगवर रडत कढत २६ धावांनी विजय मिळवला. मात्र आज भारताची झुंज पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान हे तब्बल १५ महिन्यांनंतर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

संपूर्ण विश्वाचे लक्ष या सामन्याकडे आहे. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे व लढतीच्या विशेष दडपणामुळे या सामन्याला क्रिकेटच्या व्यासपीठावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दरम्यान, ICC आणि BCCI चे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद हे मैदानात दिसून आले आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या सामन्याआधी दोनही संघ रांगेत उभे होते. त्यावेळी शरद पवार मैदानात आले आणि सोशल मीडियावर चर्चा रंगल्या. भारत आता नक्की जिंकणार, अशा आशयाच्या चर्चा नेटिझन्समध्ये रंगायला सुरवात झाली आहे.

You might also like
Comments
Loading...