fbpx

‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’

शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा :  ‘लहानातल्या लहान माणसातलं कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करण्याची वृत्ती बाळासाहेबांमध्ये होती, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. बाळासाहेबांची मतं ठाम होती असे सांगतानाच शरद पवार म्हणाले, ‘आणीबाणीच्या काळात इंदिराजींना जाहीर पाठिंबा देण्याचं धाडस कुणामध्ये नव्हतं. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित  बहुप्रतीक्षित ‘ठाकरे’ चित्रपट येत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांना ‘मानाचा मुजरा’ करण्याचा ऐतिहासिक सोहळा सोमवारी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. हा कार्यक्रम येत्या रविवार, 20 जानेवारी रोजी कलर्स वाहिनीवरून सायंकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे.यासंदर्भातील वृत्त सामनामध्ये छापून आले आहे.