…म्हणून शरद पवारांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक

sharad pawar and uddhav thakrey

मुंबई : मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी नेते हजर होते.

गेली अनेक दशके महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेला नाही. कर्नाटकच्या सीमाभागात अनेक मराठी भाषिकांना गळचेपी सहन करावी लागत आहे. त्यांच्यावर अनेक प्रकारे अन्याय केला जातो. या मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सहभागी व्हायचं आहे. मात्र, त्यांचा हा अनेक दशकांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. यावरच हे पुस्तक आधारित आहे.

या पुस्तक प्रकाशनानंतर नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कोर्टात बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही’ असं ठणकावून सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील नेत्यांनी एकत्र येऊन ‘हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ही प्रतिज्ञा घेऊया’ असं आवाहन देखील केलं आहे.

यानंतर शरद पवार यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. ‘आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी चांगली तयारी केली आहे. सुप्रीम कोर्ट हे आपले शेवटचे हत्यार आहे. त्यामुळे तिथे आपल्या चांगली तयारी करूनच जावे लागेल. आपल्याला उचित असा अनुकूल निर्णय कसा मिळेल, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत.’ असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या