फडणवीसांवर टीका करताना शरद पवारांची गडकरींवर स्तुतिसुमने

टीम महाराष्ट्र देशा : ज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात पुढे आहेत. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. मात्र आता मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार घणाघात केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी फडणवीसांवर टीका करताना शरद पवारंनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मात्र स्तुतिसुमने उधळली आहेत.

नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामेच केवळ दिसतात. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केले असे दिसत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कामांची स्तुती केली.

मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री विदर्भातील आहे. दोन महत्त्वाची खाती विदर्भात असतानाही विदर्भातील रस्त्यांचीस्थिती चिंताजनक आहे. यामुळे ‘खड्डेयुक्त रस्ता‘ असे धोरण सरकारचे असावे अशी शंका कुणाच्याही मनात आल्याशिवाय राहत नाही.

शहरातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती तर अत्यंत खराब आहे. दोन दिवसापासून मी विदर्भदौर्यावर असून प्रत्येक जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती अशीच आहे. याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

 

IMP