शरद पवारांनी पुन्हा गायले मोदी सरकारचे गोडवे !

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले ‘पॅकेज’ साखर कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केंद्र सरकारचे गुणगान गायले.

खनिज तेलाच्या आयातीमुळे केंद्र सरकारला झळा पोहोचत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर भर दिला असून इथेनॉलच्या धोरणातही बदल केला आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू करावेत, असा सल्लाही पवार यांनी साखर उत्पादकांना दिला.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याच्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट (व्हीएसआय) येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते.

You might also like
Comments
Loading...