fbpx

शेतकऱ्यांनो आता टोकाची भूमिका घ्या ; शरद पवारांचा शेतकरी संपाला पाठींबा

मुंबई : “एक शेतकरी म्हणून माझा शेतकरी संपाला पाठिंबा आहे. समाजाने शेतकरी संपाला पाठिंबा द्यावा. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. तशी त्यांची नियत दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी”. अस परखड मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. ते मुंबईमध्ये बोलत होते.

दरम्यान , “माझी विनंती आहे, आंदोलनात रस्त्यावर दूध ओतणं टाळावे. आक्रोश दाखवायचा असेल तर दूध गरीब मोहल्ल्यात वाटप करा. त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही. त्याउलट गरिबांची सहानभूती मिळेल” अस देखील शरद पवार म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे ७ तारखेपासून शहरांना पुरविण्यात येणारी सर्व रसद तोडण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे. त्यामुळे आता शेतकरी संप अजूनच चिघळण्याच्या मार्गावर असल्याच चित्र आहे.