‘गाड्यांमध्ये पेट्रोल भरून गावभर हिंडायचं असे उद्योग होताय, त्यामुळे तुमच्यासारख्यांना त्रास’

टीम महाराष्ट्र देशा –  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या फेसबुक लाईव द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी पवारांनी जनतेला शासनाच्या आदेशांचे पालन करावे असे आवाहन केले. आज देशावर सगळ्यात मोठे संकट आले आहे. याचे परिमाण दीर्घकालीन असणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्र येऊन काम केले पाहिजे.

कोरोनाचे परिणाम हे देशाच्या आर्थिक क्षेत्रावर, सामाजिक क्षेत्रावर आणि मानवाच्या मानसिकतेवर होणार आहे. तसेच पशु पक्षी , शेती उत्पन्न या सर्व घटकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. पिक कर्जाची परतफेड शक्य नाही. त्यामुळे सरकारने शेतीच्या दृष्टीने प्रभावी पाऊल उचलावी. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन काम केल पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार खासदार १ महिन्याचे वेतन देणार, असे पवार म्हणाले.

तसेच सरकारने धान्य मोफत देताना शेतमाल खरेदी बाबत विचार करावा. असेही पवार म्हणाले. पोलीस आणि आरोग्य यंत्रणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ते आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. शिस्त येण्यासाठी पोलिसांना कठोर व्हावे लागले. मात्र काही ठिकाणी पोलिसांनीही सामंजस्य दाखवावे, असे आवाहन शरद पवारांनी केले.

गाड्यांमध्ये पेट्रोल भरून गावभर हिंडायचं उद्योग होताय –

फेसबुक लाईवद्वारे शरद पवारांनी काही नागरिकांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रश्न वाचून दाखवले त्यावर पवारांनी उत्तरे दिली. यावेळी प्रदीप पाटील यांनी शेतीच्या कामासाठी जेसीबी आणि पोकलन मशीनसाठी डिझेल मिळत नसल्याचं सांगितलं. यावर पवार यांनी सांगितले कि शेतीच्या कामासाठी जेसीबी आणि पोकलेनसाठी डिझेल द्यावं याबाबतच्या सूचना राज्यशासनाने दिल्या आहेत.

‘परंतु काय होतंय, हे जे गाड्यांमध्ये पेट्रोल भरून गावभर हिंडायचं, घराच्या बाहेर पडू नका सांगितलं असतानेसुद्धा.हे जे उद्योग होताय त्याच्यामुळे थोडी बंधन आणली आहेत, ज्यामुळे तुमच्यासारख्यांना यातना होतंय ही गोष्ट खरी आहे. पण हळू हळू सरकारला या निर्णयामध्ये बदल करावा लागेल आणि पेट्रोल आणि डिझेलचि उपलब्धता करून द्यावी लागेल’,अस शरद पवार म्हणाले.

हेही पहा –