पवारांच्या गाडीचे सारथ्य रेवती सुळे यांच्याकडे, नातंही आता सक्रीय होणार ?

टीम महाराष्ट्र देशा : मागच्याच आठवड्यात शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यात पवार यांचे तीन नातू त्यांच्या सोबत होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगत असतानाच मुंबईमध्ये शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य नात आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांनी केल्यामुळे नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या मुबई ऑफीस मधील पत्रकार परिषद संपल्यानंतर शरद पवार घरी परतत असताना त्यांच्या गाडीचं सारथ्य रेवती सुळे यांनी केलं.