बागलांना डच्चू?;शरद पवार आणि नारायण पाटील एका स्टेजवर 

blank
करमाळा-  नुकताच इंदापूर येथे झालेल्या कृर्षी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात विविध विकांस कामांचे उदघाटन, कृषी प्रदर्शन व बक्षीस वितरण समारंभ आयोजीत केला होता.या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला चक्क करमाळ्याचे  शिवसेनेचे नारायण पाटील यांनी उपस्थिती लावली आणि स्वत: पवार साहेबांनीच कार्यक्रमासाठी बोलवले असल्याचे बोलले जात असून बागलांना निमंत्रण नसल्यामुळे करमाळा तालुक्यात राजकीय तर्कवितर्कांना वेग आलेला आहे.
करमाळा विधानसभेच्या संभाव्य  राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या  रश्मी बागल यांना कार्यक्रमाला न बोलवता  शिवसेना आमदारांना का  बोलवलं याची चर्चा मतदारसंघात ऐकलायला मिळतेय.
शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९९ पासून २०१३ पर्यंत राष्ट्रवादी सोबत होते, १९९९ विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक ही लढविलेली होती २००४ ला निवडणूक लढविली नाही तर २००९ ला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची जनसुराज्य कडून निवडणूक लढविलेली होती तर २०१३ मध्ये राष्ट्रवादीला रामराम करून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि २०१४ ला शिवसेनेकडून करमाळा विधानसभेवर भगवा फडकवला.
करमाळा तालुक्यामध्ये आमदार नारायण पाटील यांनी केलेली कामे कौतुकास्पद आहेत,जे २० वर्षात झाले नाही ते शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी 4 वर्षामध्ये करुन दाखवलं .रस्ते,विज,व पाणी या  समस्या  नारायण पाटील यांनी सोडवल्या आहेत त्यामुळे इंदापुर कृषी  उत्पन्न बाजार समितीच्या  विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी स्वत: शरद पवार  यांनी शिवसेना आमदार नारायण पाटील यांना कार्यक्रमासाठी बोलवलं अशी चर्चा आहे.या वेळी खा. शरद पवार, खा. विजयसिंह मोहिते-पाटील,खा. सुप्रीया सुळे, आमदार बबनराव शिंदे,आमदार दत्तात्रय भरणे,माजी आमदार राजन पाटील,आदी उपस्थित होते.